मनसेचा शिवसेना चिन्हावरून ठाकरेंना चिमटा

 

मागच्या काही दिवसांत राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण यावर आपली भूमिका मांडली आहे. धनुष्यबाण शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

‘शिवसनेच्या चिन्हाबद्द्ल. कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर धनुष्यबाण शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही. मतदान पत्रिकेवर चिन्हं महत्त्वाचं आहे, पण हे धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची चिन्हं लोकं बघतात, माणूस बघुन मतदान करतात. नवीन चिन्हांचा विचार करत नाही हे मुद्दाहून तुम्हाला सांगत आहे असे ठाकरे यांनी म्हटले.

यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की,’आतातरी अक्कल येईल असे ‘चिन्ह’ दिसत नाही’ असा टोला लगावला आहे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत उभे असून, “चिंता करू नका साहेबांनी देलेले घड्याळ आहे आमल्याकडे”, असे बोलताना दाखवले आहे. हा फोटो ट्विट करत संदीप देशपांडे यांनी “आतातरी अक्कल येईल असे ‘चिन्ह’ दिसत नाही”, असे त्यांनी लिहिले आहे.

.

Team Global News Marathi: