मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

 

मुंबई | कोरोना संसर्गामुळे मागच्या दोन वर्षांपासून पार न पडलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज, शनिवारी शिवाजी पार्क येथे होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे यंदाचा मेळावा खास असणार असून आज राज ठाकरे काय भाषण करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मुंबई महानगरपालिकेसह इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे पुन्हा एकदा मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मेळाव्यासाठीची सर्व तयारी शुक्रवारी पूर्ण झाली. मनसेच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावत कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.

सदर मुंबई महानगरपालिकेसह इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे पुन्हा एकदा मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मेळाव्यासाठीची सर्व तयारी शुक्रवारी पूर्ण झाली. मनसेच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावत कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.

Team Global News Marathi: