मनोज बाजपेयीला करोनाची लागण

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात अमरावती, नागपूर, पुणे आणि मुंबई शहरात कोरोना रुग्णसंख्या अधिक प्रमाणात वाढलेली आढळून येत आहे. आता सामान्य नागरिकांबरोबर सेलिब्रिटींना सुद्धा कोरोनाची लागण लागली आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूर आणि दिगदर्शक संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण लागली होती आता त्या पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयीला करोना झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

मनोज बाजपेयी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांनी स्वतःला घरात क्वारंटाईन करून घेतलं आहे. मनोज त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत होता. त्यादरम्यान त्याला करोना झाला. रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याने चित्रपटाचं चित्रीकरण थांबण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या दिग्दर्शकाला करोनाची लागण झाल्याने त्याने त्याची चाचणी करून घेतली. तेव्हा ती पॉसिटीव्ह आली. चित्रपटाचे चित्रीकरण काही महिने पुढे ढकलण्यात आलं आहे. सध्या मनोजची तब्येत ठीक असून त्याने स्वतःच्या घरात विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ती खबरदारी घेत आहे.

Team Global News Marathi: