औरंगाबादेत पहिल्या लसीचा डॉस घेऊन सुद्धा २१ जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या टप्यातील कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. मात्र आता पहिल्या लसीचा डोस घेऊन सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतर ही आतापर्यंत औरंगाबादमध्ये २१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहायला मिळत आहे आणि त्यातून आता लसीकरण झाल्यानंतर ही बाधा होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर ही सगळी लोक पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांना फारशी लक्षणे दिसून येत नाहीत. पहिला डोस झाल्यानंतर काळजी घेण्याची तितकीच गरज आहे असे प्रशासनाने सांगितलं आहे. दुसरीकडे लोकांच्या निष्काळजीपणामुळे हा धक्कादायक प्रकार समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं मर्यादित वेळासाठी उघडे राहतील मात्र इतर सगळे सेवा बंद असेल शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे शनिवारी सुद्धा शहरात सहाशे वर रुग्ण सापडले या सर्व परिस्थितीत आणखी काही निर्बंध लागण्याचीही शक्यता आहे.

Team Global News Marathi: