मणिपुरात भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर, दोन्ही पक्ष ४-४ जागांवर आघाडीवर

 

मणिपूर | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली असून पोस्टल बॅलट मतांची मोजणी सुरू झाली आहे.मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतून कल हाती येताना दिसत आहेत. एकूण ६० जागांपैकी १० जागांचे कल हाती आले असून भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी चार-चार जागांवर आघाडी घेतली आहे. तर एनपीपी आणि एनपीएफ एका-एका जागेवर आघाडी मिळवता आली आहे.

मणिपुरमध्ये ६० विधानसभा जागांपैकी ३१ जागा जिंकणं बहुमतासाठी आवश्यक आहे. मणिपुरमध्ये एकूण दोन टप्प्यांत (२८ फेब्रुवारी २०२२ आणि ५ मार्च २०२२) मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर आज म्हणजेच १० मार्च रोजी निकाल जाहीर होत आहेत.

२०१७ मध्ये मणिपुरमध्ये २०१७ मध्ये पहिल्यांदाच भाजपने सत्ता खेचून आणली होती. छोट्या स्थानिक पक्षांशी युती करत भाजप सत्तेवर आले. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने २८ जागा जिंकल्या होत्या तर भाजपने २१ जागांवर विजय मिळवला होता. पण भाजपने अपक्षांना गळाला लावलं. एनपीपी आणि नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) आदींसह अनेक पक्षांसोबत आघाडी करून भाजपने आपली सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत एनपीएफने ४, एनपीईपीने ४, टीएमसीने १ तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.

Team Global News Marathi: