मांडवली करु नका, शिवेंद्रराजे-शशिकांत शिंदेंच्या वादात नरेंद्र पाटलांची उडी

साताऱ्यात कोरेगाव विधानसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदेंना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. जो माणूस संघटनेचा होऊ शकत नाही, तो मतदारांचा कसा?” असा सवाल करत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी टीका केली.

तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मांडवली करु नका, असं म्हणत नरेंद्र पाटलांनी दोन्ही नेत्यांना सल्ला देत टोला लगावला आहे. तर लोकं किती पक्षनिष्ठा बदलतात, याची प्रचिती महाराष्ट्राने घेतली आहे. कोणी गद्दारी केली, हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांनी नरेंद्र पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे.

साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे या दोन नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार वाद सुरु आहे. त्यावर आता नरेंद्र पाटलांनी भाष्य केले आहे. यावर आता हे दोन्ही नेते काय उत्तर देतात हे पाहिजे लागणार आहे.

Team Global News Marathi: