वाशी टोल नाक्याजवळ मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीय कामगाराला मनसेने दिला चोप

मराठी भाषेच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ऑनलाइन शॉपिंग मध्ये नावाजलेल्या अमेझॉन कंपनीला मनसेने दणका देऊन सरळ केले होते. आता पुन्हा एकदा मराठी मुद्यावर मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.

वाशी टोलनाक्यावर ग्राहकासोबत अरेरावी भाषेत बोलणाऱ्या कर्मचाऱ्याला एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. कर्मचाऱ्याला ग्राहकानं मराठीत बोलण्यास सांगितले होते. यावर या कर्मचाऱ्यानं उडवाउडवीची उत्तरं देत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या कर्मचाऱ्याला चोप दिला आहे.

दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने माफी मागितली आहे. वाशी टोल नाक्यावर एका ग्राहकासोबत बोलताना माझ्याकडून जी गैरवर्तवणूक झाली त्याबद्दल माफी मागतो. माझ्याकडून चुकून एक वाक्य आलं. मी राज ठाकरे यांची माफी मागतो. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही, अशा शब्दांत कर्मचारी व्हिडिओत माफी मागताना दिसत आहे.

Team Global News Marathi: