मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो -निलेश राणे

चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एक दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. सर्वप्रथम त्यांनी रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांना सुद्धा जोरदार टोला लगावला होता. यानंतर जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहे असा टोला नाव न घेता फडणवीसांना लगावला होता. पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत निर्णय घेणार असून कोणत्या निकषावर मदत जाहीर करावी हे आढावा घेतल्यानंतरच ठरवणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.ते आले…अन् न पाहताच निघून गेले, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहेत. ते आले… अन् न पाहताच निघून गेले,मुख्यमंत्र्यांकडून केवळ एका ठिकाणी फेरफटका, वादळग्रस्तांची भेट नाही, नुकसानीचा पाहणी दौरा रद्द. जितका वेळ मुख्यमंत्री कोकणात आले त्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो. कोकणी माणसाने समजून जावं शिवसेना आपल्याला भावनिक करून संपायलाच निघाली आहे असा टोला राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान, वादळामुळे उध्वस्त झालेल्या कोकणी माणसाला खरी गरज होती ती त्याचे दुःख जाणून घेण्याची. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तेच केलं. शिवसेनेचे मुख्यमंत्री कोकण भेटीचा मुहूर्त शोधेपर्यंत फडणवीस आले, संकट सोसलेल्या इथल्या लोकांना भेटले आणि त्यांची व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतली, असं निलेश राणे म्हणाले आहेत आता राणे यांच्या या टीकेला शिवसेना काऊ उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: