ममता बॅनर्जींच्या विजयामागे शरद पवारांचा अदृश्य हात, भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट !

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला पराभवाची धुर चारत एकहाती विजय खेचून आणला आहे. पश्चिम बंगालच्या निकालावर महाराष्ट्रातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचे वक्तव्य अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. कैलास विजयवर्गीय यांच्या या दाव्यानुसार पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयमागे शरद पवार यांचा हात आहे.

या दाव्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कैलास विजयवर्गीय यांच्या विधानाचा हवाला देत एक ट्विट केले आहे. निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनीच हा गौप्यस्फोट केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्यानं मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसला आहे असं कैलास विजयवर्गी यांनी म्हटल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे.

विजयवर्गी यांनी केलेल्या विधानाचा अर्थ पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता, असा निष्कर्ष जितेंद्र आव्हाड यांनी काढला आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपाचा पराभव करून एकहाती सत्ता मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली होती. या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवुयात असे ट्विट त्यांनी केले होते.

Team Global News Marathi: