वॉशिंग्टन पोस्टमधून मोदींवर निशाणा : निवडणूक निकालानंतर मोदी लाट ओसरल्याचे केले विधान !

 

      वॉशिंग्टन : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला पराभवाची धुर चारत एकहाती विजय खेचून आणला आहे. पश्चिम बंगालच्या निकालावर महाराष्ट्रातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात वॉशिंग्टन पोस्टया अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे आहे. आज कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेला देश भारत ठरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभा घेऊन चुकीचा संदेश दिला असे वॉशिंग्टन पोस्टमध्ये म्हंटले आहे.

आज मोदी यांच्या या निर्णयावर अनेक तज्ज्ञांनी टीका देखील केली आहे. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा करावा लागलेला सामना हा या कोरोना काळात मोदींची लाट कमी झाल्याचेच सूचित करत असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. भाजपच्या पश्चिम बंगालमध्ये जागा मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्या, तरी अब की बार २०० पार भाजपला जमलेले नाही. ममता बॅनर्जी यांचेच सरकार पुन्हा एकदा येणार असल्यामुळे भाजपच्या अनेक दिग्गजांनी केलेला प्रचार पक्षाच्या कामी न आल्याचेच दिसून येत आहे.

दरम्यान, वॉशिंग्टन पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाची कमजोर आरोग्य व्यवस्था खिळखिळी झालेली असतानाच भारतात ४ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्यात आल्या. त्यावर बऱ्याच तज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने देखील निवडणूक काळात झालेल्या रुग्णसंख्या विस्फोटाला निवडणूक आयोगाला जबाबदार धरले होते.  आज मोठया प्रमाणात मोदी यांनी आयोजित केलेल्या प्रचार सभांमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्यास कारणीभूत ठरले आहे अशी टिपणी सुद्धा कोर्टाने काही दिवसांपूर्वी केली होती.

Team Global News Marathi: