ममता बॅनर्जी दोन दिवस मुंबई दौऱ्यावर; उद्धव ठाकरे, शरद पवारांना भेटणार

मुंबई | पश्चिम मबनलमध्ये भरती पूजनात पक्षाचा दणदणीत पराभव केल्यानंतर मुख्यमंत्रिममता बॅनर्जी यांनी येतेतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआकडे आपले लक्ष केंद्रित केले असून पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या वतीने उमेदवार उतरणार आहे. सध्या ममता बॅनर्जी ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी हा दौरा २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आखली होता. त्यापाठोपाठ त्या मुंबई दौऱ्यावर सुद्धा येणार आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ३० नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची घोषणा केली आहे. १ डिसेंबरपर्यंत त्या मुंबईत असतील. मुंबईत त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पक्षाच्या विस्तारात व्यस्त आहेत. तेच, काँग्रेससोबतचे त्यांचे संबंध बिघडल्याचे चिन्ह आहेत. बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यात अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. तर काहींनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेणार हे अपेक्षीत होतं, मात्र सोनिया गांधींच्या भेटीबद्दल विचाचल्या ममता बॅनर्जी भडकल्या.

यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत भेटीवर पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी सांगितले की, मी कुणालाही भेटण्याची वेळ मागितली नाही. केवळ पंतप्रधानांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. पंजाबची निवडणूक आहे. अशावेळी त्या व्यस्त असतील. त्यांना काम करू द्यायला हवं असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Team Global News Marathi: