गोपीचंद पडळकर अन् सदाभाऊंनी ST आंदोलन छान लावून धरलं मात्र ……..

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राज्य सरकार विरोधात एसटी कर्मचारी अंदोलन करत असून या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. दोन दोन वेळेस चर्चा होऊन सुद्धा तसेच पगारवाढ होऊन सुद्धा विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कारभारी ठाम आहेत. तसेच या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटेनचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही उपस्थित केले आहे.

आमदार पडळकर आणि खोत यांनी गेल्या १५ दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन लावून धरले होते. आझाद मैदानात ते स्वत: आंदोलनात सहभागी झाले, तसेच मैदानावरच झोपेल. त्यामुळे, या आंदोलनाला विरोधी पक्षाची मोठी ताकद मिळाली. मात्र, आंदोनलातील अखेरच्या टप्प्यात त्यांच्या भूमिकेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. बुधवारी त्यांच्याबद्दल काही मेसेज फिरल्याने त्यांनी आंदोलनातून काढता पाय घेण्याचे ठरवले होते.

पण, आंदोलकांच्या आग्रहाने ते सक्रीय झाले आणि परब यांच्यासमवेत बैठकीनंतर पगारवाढीचा निर्णय झाला. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ oखोत यांच्या या आंदोलनाचे कौतुक करत, त्यांच्यावर टीकाही करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करुन पडळकर-खोत जोडीला प्रश्न विचारला आहे.

‘आत्तापर्यंत पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी ST कर्मचाऱ्यांचे आंदोलनं अतिशय छान लावून धरले. पण, आजची त्यांची भूमिका मला चुकीची वाटते. आंदोलनाचं नेतृत्व करत असताना, अनिल परब यांच्याबरोबर त्यांनी प्रेसला बसण्याची काय गरज होती? व त्यानंतर फडणवीस यांना भेटायला जायची काय गरज?,’ असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे. तसेच, हे भाजपाच आंदोलनं आहे का? ST कर्मचाऱ्यांचे जे म्हणणे आहे त्याच्या बाहेर जाता कामा नये. यात राजकारण बिलकुल करण्यात येऊ नये

Team Global News Marathi: