ममता बॅनर्जींचा मराठी बाणा; “महाराष्ट्रातील सर्व प्रबुद्ध जनतेला माझे अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा!

 

तृणमूलच्या अध्यक्ष आणि पंचम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज दुपारी शरद पवारांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी त्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाल्या होत्या. तिथे ममता बॅनर्जींनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील जनतेची मनं जिंकली. ममता बॅनर्जींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “महाराष्ट्रातील सर्व प्रबुद्ध जनतेला माझे अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा!” त्यावेळी सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडात केला.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी देखील त्यांच्यासोबत आहेत. आज 1 डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी दुपारी 3 वाजता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी ‘सिल्व्हर ओक’वर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट होणार आहे.

ममता बनर्जी टीएमसीचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. ज्यामुळे त्या काही दिवसांपासून त्या देशभरातील राज्यांचा दौरा करत आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर आज ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तर आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: