खासदार न होताच ममता बॅनर्जी यांची संसदीय दल नेतेपदी निवड !

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दणदणीत पराभव केल्यानंतर इतर राज्यातून भाजपाला हद्दपार करण्यासाठी तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचंही कंबर कसली असून दिल्लीकडे लक्ष केंद्रित केले आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची संसदीय दल नेतेपदी निवड केली आहे.

तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढील आठवडय़ात दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वीच तृणमूल खासदारांच्या बैठकीत संसदीय मंडळाच्या अध्यक्षा म्हणून ममता बॅनजी यांची निवड करण्यात आली आहे. राज्यसभेतील खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी ही माहिती दिला. ब्रायन म्हणाले की, ममता बॅनजी 7 वेळा खासदार राहिल्या असून त्याच या पदासाठी योग्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष आणखी मजबूत होईल.

कोणताही पक्ष आपल्या ज्येष्ठ खासदाराची पक्षाच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करतो. तथापि, ही पक्षाची अंतर्गत बाब आहे, ज्याचा नियमांशी काहीही संबंध नाही.ममता बॅनर्जी मुख्यमंत्री म्हणून विविध विषयांवर केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतात. टीएमसीच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा थेट दिल्लीत प्रवेश होईल. पंतप्रधान विरोधी पक्षांच्या संसदीय मंडळाच्या नेत्यांची बैठक बोलावल्यास टीएमसीकडून त्यांना सहभागी होता येईल.

Team Global News Marathi: