ममता बॅनर्जी भाजपाला देणार जोरदार धक्का, तब्बल ३३ आमदार पुन्हा तृणमूलमध्ये घर वापरसी करणार !

पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचा दणदणीत पराभव करत एकहाती सतत काबीज केली होती. मात्र निवडणुकांपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते आणि आमदार भारतीय जनता पक्षात गेले होते. भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू होती. मात्र तृणमूल काँग्रेसने तब्बल २०० हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भाजपामध्ये गळती लागली आहे.

भाजपचे तब्बल ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाजपला मोठा राजकीय धक्का बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूलच्या बड्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीआधी कमळ हाती घेतलं. सुवेंदू यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभवदेखील केला. मात्र ममता यांनी राज्याची सत्ता राखली. त्यामुळे आता भाजपमध्ये गेलेले तृणमूलचे अनेक नेते घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. तब्बल ३३ आमदार तृणमूलमध्ये परतणार असल्याची शक्यता आहे.

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले मुकूल रॉयदेखील तृणमूलमध्ये घरवापसी करू शकतात. कधीकाळी ममता बॅनर्जींचे अतिशय निकटवर्तीय सहकारी राहिलेले रॉय निवडणूक निकालापासून शांत आहेत. त्यांचा मुलगा सुभ्रांशु रॉयनं एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे रॉयदेखील पुन्हा तृणमूलमध्ये परतू शकतात. तशी चर्चा बंगालच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Team Global News Marathi: