इंधन दरवाढीविरुद्ध आता का बोलत नाही..?; भाई जगताप यांचा बॉलीवूड अभिनेत्यांना सवाल

मुंबई : देशात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज वाढत्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडं मोडले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी बॉलीवूड कलाकरांना खडा सवाल विचारला आहे. भाई जगताप यांनी, अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि अक्षय कुमार यांना पत्र लिहीत तुम्ही इंधन दरवाढी विरोधात काहीच का बोलत नाही? असा थेट जाब विचारला आहे.

यावर माध्यमांकडून जगताप यांना पत्र लिहण्यामागचे कारण विचारले असता त्यांनी, ‘बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी काँग्रेस सत्तेत असताना पेट्रोल दरवाढी विरोधात व्यक्त झाले होते. मात्र आता ते काहीच बोलत नाहीत म्हणून मी त्यांना पत्र लिहून याबाबत विचारणा करत आहे.’ असे त्यांनी सांगितले आहे. काँग्रेस सत्तेत असताना वाढत्या इंधन दरवाढी विरोधात अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून राग व्यक्त केला होता. मात्र आता वाढत्या दरवादीविरोधात मौन बाळगून आहे हाच मुद्दा पकडून भाई जगताप यांनी टीका केली आहे.

अलीकडेच दरवाढीवरून बॉलिवूड अभिनेत्री व शिवसेना पक्ष कार्यकर्ती उर्मिला मातोंडकरने केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. तिने एका ट्विटच्या माध्यमातून खोचटरित्या केंद्र सरकारला टोमणा मारला होता. या ट्विटचे समर्थन करणारे मोठ्या संख्येत होते. कारण हेच वास्तव आहे कि इंधन दरवाढ हा विषय एका सीमेनंतर अत्यंत त्रासदायक व गंभीर परिस्थिती तयार करू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.

Team Global News Marathi: