”मलिकांचा राजीनामा घ्या, नाहीतर अधिवेशन चालू देणार नाही”

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोदी सरकारविरोधात आक्रमक झालेत. तर भाजपकडून मात्र या अटकेचं जोरदार समर्थन केलं जात असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिलीय.

गुन्हा कधीच लपत नाही. आता काही पुरावे समोर आले आहेत. दाऊदच्या प्रॉपर्टी बाबत तपास सुरू होता. फडणवीसांच्या काळात पुरावे समोर आले असते तर ही वेळ आली नसती. देशविरोधी काम करणाऱ्या सगळ्या व्यक्तींना भारतात आणून त्यांना शिक्षा होण्याबाबत पंतप्रधान मोदी प्रयत्न करत आहेत.तसेच नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही असे मलिक म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारमधील दररोज एका मंत्र्याची नाव समोर येत आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला जाब का विचारत नाहीत? फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी करायला कुणी अडवलं. आज २७ महिने झाले सरकार स्थापन होऊन का कारवाई केली नाही. दोषी असतील तर त्यांना कारवाई करायला कुणी अडवलं नाही.

Team Global News Marathi: