‘मला ज्या ठिकाणी ठेवलं तिथे योग्य व्हेंटिलेशन नाही, राऊतांची तक्रार’

 

: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. राऊत यांनी कोर्टात ईडीच्या विरोधात तक्रार केली आहे. मला ज्या खोलीत ईडीने ठेवलंय तिथे व्हेंटिलेशन व्यवस्थित नाही, अशी तक्रार संजय राऊत यांनी कोर्टाला केली आहे. कोर्टाने राऊत यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन ईडीला झापलं आहे. ही गंभीर बाब असल्याचं ईडीने म्हटलं असून ईडीने त्यावर लेखी माफी मागितली आहे.

तसेच राऊत चुकीची माहिती देत असल्याचं सांगत राऊत यांना एसी रुम देणार असल्याचं ईडीने कोर्टाला लेखी लिहून दिलं आहे. राऊत यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात आणण्यात आलं आहे. त्यांच्या जामिनावर आज सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे कोर्ट राऊतांना जामीन देणार की त्यांना कोठडी सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. थोड्याच वेळात कोर्टाकडून याबाबत निर्णय येणार आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात आणण्यात आलं. राऊत यांना कोर्टात आणताच तुम्हाला ईडी कोठडीत काही त्रास झाला का? असा सवाल कोर्टाने राऊतांना विचारला. त्यावर मला ज्या खोलीत ठेवलं आहे. तिथे व्हेंटिलेशन व्यवस्थित नाही, असं राऊत म्हणाले. तसेच आपल्याला पंखा देण्यात यावा, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. राऊतांच्या या तक्रारीची कोर्टाने गंभीरपणे दखल घेत ईडीला फटकारलं.

ईडीच्या कोठडीत व्हेंटिलेशन नाही ही गंभीर बाब आहे. आता तुम्ही काय करणार आहात हे सांगा? अशी विचारणा कोर्टाने ईडीला केली. त्यावर ईडीने कोर्टाची आधी माफी मागितली. त्यानंतर राऊत चुकीची माहिती देत आहेत. त्यांना आम्ही एसी रुममध्ये ठेवलं आहे. त्यांना पुन्हा दुसऱ्या एसी रुममध्ये ठेवणार आहोत, अशी लेखी माहिती ईडीने कोर्टाला दिली आहे.

Team Global News Marathi: