शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय; वाचा सविस्तर

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय; वाचा सविस्तर

ग्लोबल न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात (Cabinet Meeting Decision) आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर 2022 पूर्वी पार पडणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याशिवाय राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

यामध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा ‘सेवा पंधरवाडा’ म्हणून साजरा करणार आहोत. 17 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी माझा वाढदिवस साजरा करू नका, जनतेची सेवा करा असा आग्रह करतात, त्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या १५ दिवसांत जनतेची सेवा करणार आहोत. जनतेची जी काही प्रलंबित प्रकरणे आहेत, ती आम्ही निकाली काढणार आहोत. यामध्ये रेशन कार्डचीसुद्धा रखडलेली कामंही पूर्ण केले जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

 

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय –

17 ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता से राष्ट्रपिता हा सेवा पंधरवडा राबविणार

अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार, नागरी सुविधा पुरविण्यासाठी धोरण

नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता

 

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास मान्यता

महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या मुंबई, पुणे व नागपूर खंडपीठास मुदतवाढ

केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणीकरण करण्यासाठी योजना राबविणार

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सप्टेंबर 2022 पूर्वी पार पडणार नाही, प्रशासकांचा कालावधी वाढणार

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: