मी वंजारी समाजाची सून, भगवानगडावर दसरा मेळावा पुन्हा सुरु करणार

 

मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होऊ नये, यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहेत. यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गट यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असताना दसरा मेळाव्याच्या राजकारणात करुणा शर्मा यांनी उडी घेतल्याचे सांगितले जात आहे. मी वंजारी समाजाची सून असून, भगवानगडावर दसरा मेळावा पुन्हा सुरु करणार असल्याचा निर्धार करुणा शर्मा यांनी केला आहे.

मी वंजारी समाजाची सून आहे. मला दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. मी तो घेणारच आहे. दसऱ्याच्या दिवशी माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. भगवानगडावरील दसरा मेळाव्यात माझ्या मुलीलाही सोबत नेणार आहे. यासाठी गडाचे महंत नामदेव शास्त्री सानप यांची भेट घेऊन मेळाव्यासाठीची परवानगी घेणार आहे, अशी माहिती करुणा शर्मा यांनी दिली.

मी महाराष्ट्राची अशी रणरागिणी आहे की माझे नाव घेताच लोक घाबरतात. परंतु मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानते की, त्यांनी माझ्यासारख्या रणरागिणीला भूमिका मांडण्यासाठी संधी दिली. एकनाथ शिंदे हेच खरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या रेसमध्ये आता मी पण उतरली आहे. मी पण दसरा मेळावा भगवानगडावर घेणार आहे, असे करुणा शर्मा यांनी स्पष्ट केले

Team Global News Marathi: