माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ; पर्यावरण विभागासाने धाडली नोटीस

 

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अस्लम शेख यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांना मढ परिसरातील कमर्शियल फिल्म स्टुडियो प्रकरणात पर्यावरण विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.’अस्लम शेख यांना मढ मार्वेच्या 1000 कोटींच्या स्टुडिओ घोटाळा प्रकरणात महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे.

या प्रकरणात मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेने कठोर कारवाई करावी असे आदेश नोटीसीमध्ये देण्यात आले आहेत. आता मला स्टुडिओ तोडण्याच्या कारवाईची अपेक्षा आहे’ असे किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान अस्लम शेख यांना आता या बांधकाम प्रकरणात पर्यावरण विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री आणि मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अस्मम शेख यांनी कोरोना काळात मालाड पश्चिमेकडील मढच्या समुद्रात सर्व नियमांना धाब्यावर बसवत बांधकामास मदत केली. त्यांनी मढ परिसरात तब्बल 28 फिल्म स्टुडियोचे कमर्शियल बांधकाम सुरू केले आहे. यातील पाच स्टुडियो हे ‘सीआरझेड झोनमध्ये येत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच या प्रकरणात कोट्यवधीचा घोटाळाही झाल्याचे त्यांनी म्हटले होते.

Team Global News Marathi: