आंबा बागायतदारांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेणार – उदय सामंत

 

आंबा बागायतदारांना आजवर विविध संकटांचा सामना करावा लागतो. चांगल उत्पादन येऊनही कधी नैसर्गिक आपत्तीचा फटका तर कधी सरकारी धोरणाचा तर कधी कमी दर मिळाल्यानं मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळं आंबा बागायतदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पुढच्या आठ दिवसात मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली. आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडणार असल्याचे सामंत म्हणाले.

मागच्या दोन वर्षांपासून आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, वादळ यामुळं आंबा बागायतदार उध्वस्त होऊन कर्जबाजारी झाला आहे. या संकटातून त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. दरम्यान, बॅंका आणि वित्तीय संथा बगायतदारांची पिळवणूक करत असल्याचा आरोप आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी माजी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केला होता. याची दखल घेत सामंत यांनी याबाबत मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे.

मागील अडीच वर्षाच्या काळात आबा बागायतदारांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात सकारात्मक बैठक झाली नसल्याचे उदय सामंत म्हणाले. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचे सामंत म्हणाले. आंबा उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊ असे सामंत म्हणाले.

Team Global News Marathi: