माजी क्रिकेटपटू इरफान पठाण लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पदार्पणाच्या बातम्या येत असून चाहत्यांची उत्सुकता वाढली होती अशातच इरफान पठाणच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून याविषयीचीच चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे.
इरफान पठाण ‘कोब्रा’ या तमिळ चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवणार आहे. क्रिकेटरचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आता अभिनयातही आपलं नशीब आजमवणार आहे. ‘कोब्रा’ या तमिळ चित्रपटातून इरफान अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून तो पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे.
समोर आलेल्या धमाकेदार ट्रेलरमध्ये इरफानचा जबरदस्त अभिनय पहायला मिळत आहे. सुरेश रैनाने इंस्टाग्रामवर ‘कोब्रा’चा ट्रेलर शेअर करत इरफानचं अभिनंदनही केलं आहे. तसेच क्रिकेटमधील अनेक सहकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.