म्हात्रेताई, मिंधे गटाला खूश करण्यासाठी फोटो टाकला काय ?रुपाली पाटलांचा शीतर म्हात्रेंना टोला

 

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला बनावट फोटो वादात सापडला आहे. तो फोटो मॉर्फ असल्याचा दावा करत राष्ट्रवादीने फोटोमागचं सत्य सांगून शीतल म्हात्रेंना आरसा दाखवला आहे. शीतल म्हात्रेंच्या ट्विटवर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. ट्विट डिलीट करा नाहीतर कारवाई करु, असा इशाराच राष्ट्रवादीने शीतल म्हात्रेंना दिला आहे.

दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी शीतल म्हात्रेंवर बोचरी टीका केलीये. म्हात्रेताई, मिंधे गटाला खूश करण्यासाठी फोटो टाकला काय?, असा सवाल त्यांनी फेसबुक पोस्ट करुन विचारला आहे. कल्याणचे खासदार तथा मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी श्रीकांत यांच्या मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न केला.

श्रीकांत शिंदे यांच्यावर हणाऱ्या टीकेला प्रतिउत्तर देताना सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा कथित फोटो सोशल मीडियावर शेअर केला. कोण कुणाच्या खुर्चीत बसलंय, बघा तुम्हीच… असं कॅप्शन देऊन सुप्रिया सुळे यांचा तो फोटो शीतल म्हात्रे यांनी ट्विट केला. कालचं ‘मुख्यमंत्र्यांचं खुर्ची प्रकरण’ श्रीकांत शिंदे यांच्या स्पष्टीकरणानंतर थंड होईल, असं वाटत असतानाच शीतल म्हात्रेंच्या फोटोने आज पुन्हा वातावरण गरम झालं आहे.

Team Global News Marathi: