महाविकास आघाडीच्या अजून दहा लोकांवर किरीट सोमय्यांचा निशाणा

 

राज्यातील ठाकरे सरकार आता नौटंकी करत आहे. पवार साहेब कुणा – कुणासाठी हिशोब मागणार, ही तर सुरवात आहे. अजून दहा लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार आहोत, विधीमंडळाचे अधिवेशन चालू दिल्यास आम्ही सरकारवर अविश्वास ठराव दाखल करू, अशी टीका भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातील मंत्र्यांवर टीका करताना सोमय्या म्हणाले, ”महाराष्ट्रात नटसम्राट एकच होता, पण ते पद आता ह्यांना द्यावं लागेल. बहीण नाही तर अजित पवारांनी आपल्या आईच्या नावावरही बेनामी इस्टेट जमा केली केली आहे. तसेच भावना गवळी यांनी सरकारचे ४४ कोटीं ढापले, आनंदराव अडसूळ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला. त्यासाठी त्यांना नोटिसा दिल्या गेल्यात. यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार काहीच का बोलत नाहीत.

तसेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्नीच्या नावे १९ बंगले बांधले आहेत. खासदार संजय राऊत यांनी बेनामी ५५ लाख परत करून माफी मागितली आहे. जालना सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण उघडकीस आले आहे. कारखान्याचे मालक अर्जुन खोतकरच असल्याचे पुरावे दिले आहेत. पवार साहेब कुणा-कुणासाठी हिशोब मागणार, ही तर सुरूवात आहे. अजून दहा लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार आहोत, विधीमंडळाचे अधिवेशन चालू दिल्यास आम्ही सरकारवर अविश्वास ठराव दाखल करणार आहोत.”

Team Global News Marathi: