राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – वार – सोमवार, दि. 22.11.2021

शुभाशुभ विचार- 9.00 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष — सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – मृग 10.43 पर्यंत, नंतर आर्द्रा.
चंद्र राशी – मिथुन.
_______________________

आजचे राशीभविष्य-

मेष – (शुभ रंग- मोतिया)

आज तुमच्यासाठी संमिश्र फळे देणारा दिवस असून आज बेरोजगारांना रोजगार मिळेल. भावाभावात सामंजस्य राहील. आज काही महत्त्वाचे फोन येतील. गृहिणी शेजारधर्म पळतील.

वृषभ – ( शुभ रंग- तांबडा)

कार्यक्षेत्रात पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यशाची चाहूल लागेल. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. दैव आज तुमच्याच बाजूने आहे. कौटुंबिक जीवन समाधानी राहील.

मिथुन – (शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल. तुमचा उत्साह व कार्यक्षमताही वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. आर्थिक सुबत्ता येईल.

कर्क – (शुभ रंग- क्रीम)

हट्टीपणा सोडा, मनाच्या लहरीपणास आवर गरजेचा आहे. अति महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून आपल्या तब्येतीकडे ही लक्ष द्यायला हवे. उधारी उसनवारी आज नको.

सिंह – ( शुभ रंग- हिरवा)

काही अनुकूल घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. जुन्या गुंतवणुकीतून मनाजोगता लाभ होईल. आप्तस्वकीय तुमच्या शब्दाला मान देतील.

कन्या – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. वाढीव जबाबदाऱ्या मात्र टाळता येणार नाहीत. मित्र आज दिलेली आश्वासने अजिबात पाळणार नाहीत.

तुळ – ( शुभ रंग -आकाशी)

नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपले काम बिनचूक कसे होईल यावर लक्ष देणे हिताचे राहील. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये. नास्तिक ही देवाला एखादा नवस करतील.

वृश्चिक – ( शुभ रंग – जांभळा)

काही मानापमानाच्या प्रसंगाना तोंड द्यावे लागेल. आज थोडी संयमाची कसोटी राहील. फास्ट ड्रायव्हिंग टाळा. आज फक्त आपला स्वार्थ बघा, परमार्थ झेपणारा नाही.

धनु – ( शुभ रंग- निळा)

आज तुमची तब्येत जरी नरम असली तरी तुमच्या कामातील उत्साह दांडगा राहील. व्यवसायिकांची आवक उत्तम राहील. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

मकर – ( शुभ रंग – चंदेरी)

आज दिवस जरी तितकासा अनुकूल नसला तरी तुमची काही येणी असतील तर ती वसूल होतील. मामा मावशी यांच्याकडून काही शुभवर्तमान कळेल.

कुंभ – ( शुभ रंग -गुलाबी)

आज आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. काही फसव्या संधी येऊ शकतात. हातचे सोडून मृगजळामागे धावण्या पूर्वी पूर्ण विचार करावा. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील.

मीन – ( शुभ रंग- भगवा)

उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. गृहिणींना शारीरिक थकवा जाणवेल.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: