राणे कुटुंबीय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवारावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाहीत अष्टक आता पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीवर उद्धव ठाकरेंचे ओझे झाले आहे. 1 मे ला महाराष्ट्र दिनाला होणारी महाविकास आघाडीची सभा ही शेवटची सभा असेल. यानंतर वज्रमूठ सभा होणार नाही, असा दावा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
तसेच संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.महाराष्ट्रात भाजपला शिंदे सरकारचे ओझे झाले आहे. आणि हे ओझे किती काळ खांद्यावर घेऊन फिरायचे हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मी चर्चा ऐकल्या आहेत, असा टोला खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. या टीकेला भारतीय जनता पक्षाने जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या केलेल्या कौतुकावरुन राणे म्हणाले, एकाच दिवसात फरक पडेल असे वाटले नव्हते. राऊत यांचा चेहरा आज उतरलेला होता. असे त्यांच्याशी लढण्यात मजा नाही. राऊत यांच्या भोंग्याचा डेसिबल कमी झाला. राऊत म्हणायचे मी पवारांचा माणूस आहे. हे उद्धव ठाकरेंचे देखील नाहीत आणि शरद पवारांचे देखील नाहीत. मग हे राजकारणातले लावारीस आहेत का? असा उपरोधी सवालही त्यांनी यावेळी विचारला.
राणे पुढे म्हणाले, राऊत स्वतःला शिवसैनिक समजतात. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेची तारीखही माहित नाही. तो शिवसैनिक असण्याच्या बाता करतो. त्याला शिवसेनेबद्दल किंवा बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. हा चायनिज मॉडेल आहे. ओरिजनल नाही. लोकप्रभातला असताना हे बाळासाहेबांना शिव्या घालायचे असा आरोपच राणे यांनी केला होता.