महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच

 

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. सेनेतील अंतर्गत फुट आज महाविकास आघाडीवर भारी पडताना दिसून येत आहे. अशातच आज पहाटे एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. या सर्व मोठ्या घडामोडी राज्यात सुरु असताना भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

उदयनराजे म्हणाले कि, महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच, असं उदयनराजे स्पष्टच बोलले. तसेच पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात मला धक्कादायक असं काही वाटत नाही. दोन वर्षापासून खदखद सुरु आहे. ज्यावेळी वेगवेगळे लोक एका ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र येतात तेव्हा त्यांना कुठलं आमिष दाखवण्याची गरज नसते. पण सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या आयडॉलॉजीचे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांना सत्तेसाठी तारेवरची कसरत करावी लागते, असं उदयनराजे म्हणाले.

तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या टर्म संपत आहेत. सर्वांना निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे. अशावेळी आपण विचार केला तर शिवसेना आणि भाजपच्या मतदारसंघात विरोधक कोण आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे. त्यामुळे ही समीकरणं जुळणार नव्हतीच. ही लोक फार काळ एकत्र राहू शकत नाहीत, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

Team Global News Marathi: