मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण नाना पटोले यांची माहिती

 

मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ठाकरेंनी त्यांच्या अट मान्य न केल्याची चर्चा आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या राजकीय कलहामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्यपाल यांच्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. व्हिडीओ कॉलद्वारे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहतील असेही नाना पटोले म्हणाले.

तसेच एकीकडे विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण नाहीये असं म्हंटलय तर दुसरीकडे नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे कोरोनावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद होत असताना पाहायला मिळत आहेत. यावर आता शिवसेना नेते काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: