महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी पूजाविधी आणि पूजेचा मुहूर्त !

महाशिवरात्री विशेष : जाणून घ्या भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी पूजाविधी आणि पूजेचा मुहूर्त !

 

टीम ग्लोबल  : माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे.

 

महाशिवरात्री म्हणजे काय : पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.

 

पंचांगानुसार ११ मार्च रोजी महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिष गणितानुसार या दिवशी विशेष योगायोग तयार होत आहेत. यावर्षी शिवरात्रौत्सव शिवयोगात साजरा केला जाईल, हा शुभ योग आहे. धनिष्ठ नक्षत्र या दिवशी राहील. मकर राशीमध्ये मध्ये चंद्र शनि व  गुरु यांच्यासमवेत असेल .

महाशिवरात्रीच्या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिवची पूजा केली जाते. भगवान शिव आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत . महाशिवरात्रीच्या दिवशी विधिपूर्वक पूजा केल्यास सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. भगवान शिव यांच्या या पूजेमध्ये पूजा सामग्रीचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. जाणून घ्या महाशिवरात्रीच्या दिवशी लागणाऱ्या पूजेच्या सामग्रीबद्दल.

 

भगवान शिवांना एक अतिशय प्रसन्न देवता मानले जातात. भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महाशिवरात्री दिवस खूप चांगला मानला जातो. म्हणूनच वर्षभर शिवभक्त महाशिवरात्रीच्या उत्सवाची प्रतीक्षा करतात. भगवान शिवच्या पूजेमध्ये काही खास गोष्टी वापरल्या जातात. म्हणून आतापासूनच पूजा साहित्य गोळा करण्याची तयारी सुरू केली पाहिजे.

 

महाशिवरात्री साठी लागणारी पूजेची सामग्री

महाशिवरात्रीची पूजा विशेष आहे. पूजा सामग्रीत अशा गोष्टी वापरल्या जातात ज्या भगवान शिवांना प्रिय आहेत. पूजा सामग्रीत शुद्धता व स्वच्छतेसाठी विशेष काळजी घेतली पाहिजे.

 

महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये दही, मोली, अक्षत (तांदूळ), मध, साखर, पाच प्रकारची हंगामी फळे,गंगाजल , जनेऊ, कपडे,  अत्तर , फुलांची माळ , खस, शमी पत्र, लवंग, सुपारी, तसेच पान, रत्ने, दागिने, परिमल द्रव्य, वेलची, धूप, शुद्ध पाणी यासह या गोष्टींचा समावेश आहे

 

बेलाची पाने

भांग

मदार

धोत्र्याची फुले

कच्च्या गाईचे दुध

चंदन

रोली

कपूर

केशर

महाशिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त

शुभ मुहुर्तात पूजेच्या सामग्रीसह महाशिवरात्रीच्या पूजेला प्रारंभ करा. यावेळी, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष्याच्या चतुर्दशीला तारीख ११ मार्च रोजी दुपारी २ वाजून ३९ मिनिटांनी पूजा सुरु करू शकता जी १२ मार्च रोजी दुपारी ३ वाजून २ मिनिटांपर्यंत राहील.

 

निशिता काळ पूजेचा मुहूर्त

महाशिवरात्रीच्या दिवशी निशिता काळ पूजेचा मुहूर्त रात्री १२ वाजून ०६ मिनिटांनी सुरु होईल जो रात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी संपेल .

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: