महाराष्ट्राने गुजरातपेक्षा ११ हजार कोटींच्या जादा सवलती दिल्या मात्र

 

मुंबई | काही दिवस सत्ताधारी आणि विरोधक या दोघांकडूनही फॉक्सकॉनवरून जोरदार रणकंदन सुरु असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच लोकशाही आघाडी सरकारच्या कामाचे वास्तव समोर मांडले. राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकारने गुजरात पेक्षा ११ हजार कोटीच्या जादा सवलती फॉक्सकॉनला दिल्या होत्या. यासाठी लागणारी जागाही नक्की झाली असताना केवळ केंद्राने हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर पॉलिसी बदलल्याने फॉक्सकॉन गुजरातला गेला आणि आता तिथे जागा शोधण्यापासून कमला सुरुवात केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात फॉक्सकॉन उभा राहणार हे नक्की होत असताना केंद्र सरकार आणि फॉक्सकॉनचे मालक यांची भेट झाली . यानंतर सेमीकंडक्टर उद्योगाला जी १२ हजार कोटींची सवलत होती ती अट केंद्राने काढून टाकल्याने आता ही कंपनी जेवढे कोटी नफा मिळवेल तेवढी तिला सवलत असणार आहे . केंद्राने हि सवलतीची मर्यादा काढून टाकल्यानेच फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचे रोहित पवार यांनी सांगितले .

फॉक्सकॉन वरून भाजप नेते लंगडे खुलासे करीत पूर्वीच्या ठाकरे सरकारवर आरोप करीत असताना आमदार रोहित पवार यांनी हा प्रकल्प नेण्यामागे केंद्र सरकारचा कसा हात होता हे समोर आणले आहे. तसेच सध्या एका एका मंत्र्याकडे एकापेक्षा जास्त जिल्ह्यांचे पालकत्व आल्याबाबतही रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले. मंत्रिपदासाठी इकंचुकांची संख्या जास्त असल्याने नाराजी टाळण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार मुंबई महापालिकेच्या निवडणूक होईपर्यंत लांबवण्यावर हे सरकार विचार करीत आहे

Team Global News Marathi: