महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर थोड्याच वेळात फैसला, नेमकी शिवसेना कोणाची ?

 

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

या याचिकांवर पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे एकत्रित सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी करून स्थापन केलेल्या सरकारचे भवितव्य या याचिकांच्या निकालावर अवलंबून आहे. खरी शिवसेना कोणाची, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित असून ती सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय आज अपेक्षित आहे.

दरम्यान, जनतेला सत्तासंघर्षाची सुनावणी लाईव्ह पाहता येणं शक्य होणार आहे. आजपासून सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. घटनापीठाच्या सुनावण्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय न्यायालयाच्या बैठकीत घेण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं, याबाबत याचिका दाखल केल्यानंतर सुमारे चार वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला. या लिंकवर : https://webcast.gov.in/scindia/ महाराष्ट्राचं प्रकरण कोर्टात कामकाजात समावेश केला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे.

Team Global News Marathi: