तुझ्यासाठी मी बऱ्याच मुली सोडल्या’ सोशल मीडियावर ओळख पडली विवाहितेला भारी

 

स्टाग्रमावर ओळख झालेल्या विवाहितेचा पाठलाग करत तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडून दिल्या असे म्हणत अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणा विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मयूर भागवत धनावडे असे आरोपीचे नाव आहे. एका विवाहितेची इंस्टाग्रामवर मयुर सोबत ओळख झाली होती. या ओळखीतून तो विवाहितेचा सतत पाठलाग करीत होता.

विवाहितेचे आरोपीस बोलण्याची इच्छा नसतानाही त्याने पाठलाग सुरुच ठेवला. आरोपीने विवाहितेकडे जाऊन, तू माझ्याशी का बोलत नाही, मी तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडून दिल्या, असे म्हणत विवाहितेला स्वत:जवळ ओढून घेत अश्लिल वर्तन केले. तेव्हा विवाहितेने आरोपीला विरोध केला असता, त्याने शिविगाळ केली.

तसेच तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुला व तुझा पती, मुलगा आणि आई वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास सिडको पोलीस करीत आहेत. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास एन 5 सिडकोतील गुलमोहर कॉलनी येथे आरोपीने विवाहितेकडे जाऊन म्हणाला, तू माझ्याशी का बोलत नाही, मी तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडून दिल्या, असे म्हणत विवाहितेला स्वत:जवळ ओढुन घेत अश्लिल वर्तन केले.

Team Global News Marathi: