महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेच्या आंदोलनाला यश, स्टार-स्पोर्ट्स वाहिनीचे प्रशासकीय अधिकारी राज ठाकरे यांची घेणार भेट

 

मुंबई प्रतिनिधी | १६ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या टी २० विश्वचषकचे प्रक्षेपण सर्व भाषांमध्ये दाखवले जाणार आहे. मात्र पुन्हा एकदा मराठी भाषेला स्टार-स्पोर्टस वाहिनीकडून डावलण्यात आल्याचे चित्र दिसून आल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष श्री. सतीश रत्नाकर नारकर यांच्या अध्यक्षतेखालीस्टार-स्पोर्टस वाहिनीच्या लोअर-परेल येथील कार्यालयावर उद्या दुपारी १:०० वाजता धडक मोर्चा काढण्यात आला होता.

मात्र मनसे आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या संघटनेच्या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता स्टार-स्पोर्टस वाहिनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमते घेऊन तसेच या आंदोलनाची धास्ती घेत थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची उद्या दुपारी १२:०० वाजता भेट घेणार आहे. तसेच त्यांच्या समोर आपली बाजू मांडून झालेल्या चुकीसंदर्भात चर्चा करणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष श्री. सतीश नारकर यांनी आयसीसी टी-२० वर्ल्ड कप क्रिकेटचे प्रक्षेपण मराठी मध्ये दाखवावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा दोनच दिवसांपूर्वी वहिनीला दिला होता, या इशाऱ्यानंतर फक्त ४८ तासात स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी राज ठाकरे यांची उद्याची वेळ घेतली आहे.

तत्पूवी आंदोलनांची परवानगी घेण्यापूर्वी अध्यक्ष सतीश नारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने आंदोलन दडपण्यासाठी नोटीस बजावल्या होत्या. मात्र मराठी भाषेची होत असलेली गाळपेच कदापि सहन न करता उद्या कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणारच अशी हाकच सतीश नारकर यांनी दिली होती या आंदोलनाची धास्ती घेऊन अखेर स्टार स्पोर्टस वाहिनीने नमते घेत थेट राज ठाकरे यांच्या पुढे आपली बाजू मांडण्यासाठी भेटण्यासाठी वेळ मागितली आहे तसेच हे महाराष्ट्र टेलिकॉम सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे यश असल्याचे विधान सतीश नारकर यांनी केले आहे.

Team Global News Marathi: