“महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून…” अमोल मिटकरींनी साधला भाजपवर निशाणा

 

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर बुधवारी रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. अनेक राजकीय घडामोडीनंतर अखेर महाराष्ट्रातील राजकारणावर पडदा पडला. यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी थेट भाजपवर निशाणा साधत टीका केली.

“आज महाराष्ट्राने एक उत्तम व सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला. याची नोंद तरुणांच्या हृदय पटलावर कायम राहील महाराष्ट्राच्या जनमनात कायमचे स्थान मिळवणाऱ्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यास मनापासून दंडवत.”, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

तसेच पुढच्या ट्वीटमध्ये मिटकरी यांनी म्हटले कि, “जय महाराष्ट्र! एक सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची जनता शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांना कधीच विसरू शकणार नाही. कोरोना सारखी संकट, चक्री वादळ पेलणारे आपण, आज इतकेच सांगतो महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून साजरी करणारी तोंडं लवकरच काळी झालेली दिसतील.”, असा टोला मिटकरी यांनी भाजपला लगावला.

Team Global News Marathi: