उद्धवसाहेब कुठेही दुखावले गेले नाही पाहिजे’ दीपक केसरकरांच्या आवाजात काळजीचा

 

बुधवारी महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा एक अंक काल पूर्ण झालाय. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं अन् आता राज्याच्या राजकारणाचा दुसरा अंक सुरु झाला आहे या अंकाच्या केंद्रस्थानी आहेत, देवेंद्र फडणवीस आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे… या दोघांच्या भोवती हा अंक रचला जाणार आहे. पण या सगळ्या आधी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बातचित केली तेव्हा ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. ‘उद्धवसाहेब कुठेही दुखावले गेले नाही पाहिजे’, असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

काहीही झालं तरी उद्धव ठाकरे दुखावायला नको, असं दीपक केसरकर म्हणाले. “सत्तेसाठी आम्ही काहीही केलेलं नाही. मी खोटं बोलत नाही. आम्ही तात्विक भूमिका बाजूला न ठेवता हे सगळं घडलं पाहिजे.उद्धव साहेब कुठेही या दुखावले गेले नाही पाहिजे.दह- दहा लोकं जेव्हा एकावेळेला बोलतात, तेव्हा अपमान होऊ शकतो. स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. ते होऊ नये म्हणून काळजी घेतोय. कुणाचंही मन दुखवायचं नसतं. ते तथ्य आम्ही जसं पाळतो, तसं तुम्हीही पाळलं पाहिजे. तुम्ही जर सत्तेवर येत असाल, तर त्यांना थांबवलंही पाहिजे”, असं म्हणत दीपक केसरकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सत्ता स्थापना करताता आम्हाला आमच्या नेत्याला दुखवायचं नाही. भावनांची कदर ठेवली पाहिजे. शिवसेना म्हटलं की बाळासाहेबांचा विचार येतो, ठाकरेंशी असलेलील बांधिलकी येते, प्रत्येक गोष्ट येते… कुठलाही मनुष्य आपोआप मोठा होत नाही. आम्ही तत्त्वांवर बोलतो. पवार साहेबांची आमची विचारांची लढाई आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जो लढा द्यायचा होता, तो दिला”, असंही ते म्हणाले.

Team Global News Marathi: