नवाब मलिक यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, मोहित कंबोज याने साधला निशाणा

 

मुंबई | आर्यन खानच्या अटकेचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी केला आहे. यावरुन आता मोहित कंबोज यांनी मलिकांना उत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.नवाब मलिक आता स्वत: हिट विकेट झाले आहेत. आता त्यांना काय करावं हे कळत नाहीय, असंही कंबोज म्हणाले.

आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना कंबोज यांनी आज सडेतोड प्रतिउत्तर दिले होते. ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध आहेत हे नवाब मलिकांनी मान्य केलं आहे. माझी नवाब मलिकांना विनंती आहे की राष्ट्रवादीच्या मोठ्या मंत्र्यांच्या मुला-मुलींशी ड्रग्ज पेडलरशी कसे संबंध होते हे सांगा असा सवाल कंबोज यांनी केला आहे.

मोहित कंबोज म्हणाले की, मला नवाब मलिक मास्टरमाईंड म्हणतात,एक महिना काय झोपले होते का?आजच कसं सुचलं. सुनील पाटीलशी संबंध आहे हे देखील मलिकांनी मान्य केलं आहे. चिंकु पठाण या ड्रग्ज माफियाचे समीर खानशी कोणते संबंध? चिंकू पठाणची अनिल देशमुख यांच्यासोबत गुप्त बैठक झाली होती. नवाब मलिकांना मला सांगायचंय की मी तुम्हांला घाबरत नाही, माझ्यावर केस टाकल्या,चौकश्या झाल्या तरी मी घाबरत नाही. सुनील पाटील आणि नवाब मलिकांची मैत्री आजची नाही २० वर्षांपासून आहे, असंही मोहित कंबोज म्हणाले.

Team Global News Marathi: