महाराष्ट्रात कडक्याच्या थंडीसह पावसाची शक्यता

 

गेल्या अनेक दिवसांपासून देशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे तर अनेक ठिकाणी कडक्यांची थंडी पडत आहे. पुढील काही दिवसांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्य सध्या थंडीने गारठले आहेत.

भारतीय हवामान खात्यानुसार पुढील दोन दिवसांत विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या नविविध भागांमध्ये कडक्याची थंडी पडली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात थंडीची लाट ही कायम राहणार असून आज रात्री आणि उद्या सकाळी हरियाणा आणि पश्चिम प्रदेशातील अनेक ठिकाणी दाट धुके राहू शकते.

तसेच स्कायमेट वेदर ने दिलेल्या माहितीनुसार अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सारी पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानुसार उत्तर-पश्चिम भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे

Team Global News Marathi: