महाराष्ट्रातील भाजपा नेते अडचणीत; झारखंड सरकार पाडण्यात महाराष्ट्रातील तीन नेत्यांचा समावेश !

 

 

झारखंडमधील हेमंत साेरेन यांचे सरकार पाडण्याच्या विरोधकांचं डाव पोलिसांनी उघड केल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. यात अटक करण्यात आलेल्या आराेपींचे महाराष्ट्र कनेक्शन समाेर आले आहे. मात्र, पाेलिसांनी केलेल्या या कारवाईवरच आता संशय व्यक्त करण्यात येत आहे.

 

महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटींमागे हवाला कनेक्शनचा शक्यता असून ते लपविण्यासाठी सरकार पाडण्याचा कट असल्याचे प्रकरण पाेलीसांनी उभे केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी महाराष्ट्रातील नेत्यांची चाैकशी हाेण्याची शक्यता आहे. या संबंधातील माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली होती.

 

झारखंडमध्ये आमदारांचा घाेडेबाजार करून सरकार पाडण्याचा कट रचण्यात आला हाेता. याबाबत आमदार अनुप सिंह यांनी केलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी छापे मारले हाेते. पाेलिसांनी एका हाॅटेलमधून अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण महताे यांना अटक केली हाेती. हे तिघे २१ जुलैला जयकुमार बेलखोडे, माेहित कंबाेज, अनिल कुमार, जयकुमार शंकरराव आणि आशुताेष ठक्कर यांना हाॅटेल ली-लॅकमध्ये भेटल्याचा दावा पाेलिसांनी केला आहे.

 

पोलिसांनी छापा टाकण्याच्या १५ मिनीटांपूर्वीच हे सर्व नेते निघून गेले हाेते. अन्यथा त्यांनाही अटक झाली असती. जयकुमार बेलखोडे हा भाजपचे माजी आमदार व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाचा आहे, तर माेहित कंबाेज हे मुंबईतील माेठे व्यावसायिक व मुंबई प्रदेश भाजपचे माजी उपाध्यक्ष आहेत.

 

झारखंडमध्ये भाजपचे २५ आमदार आहेत. बहुमतासाठी ४२ आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. त्यामुळे झारखंडमध्ये सरकार पाडणे भाजपसाठी साेपे नाही. त्यातच संशयित आराेपी असलेले किरकाेळ व्यावसायिक आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या मदतीने सरकार पाडण्याचे कारस्थान रचण्याची काय गरज पडली? रांची पाेलिसांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन केली आहे. चार पथके हाॅटेलपासून विमानतळापर्यंत विविध ठिकाणी तपासामध्ये गुंतले आहेत.

Team Global News Marathi: