महाजन यांना झालेल्या कोरोनावर एकनाथ खडसे यांनी उपस्थित केली शंका

भाजपा नेते, माजी मंत्री आणि फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सारथी गिरीश महाजन यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. जळगाव मनपा निवडणुकीच्या पूर्वी त्यांना कोरोना झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली होती. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि महाजन यांचे जुने सहकारी एकनाथ खासे यांनी शंका उपस्थित केली आहे.

खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांना खरंच कोरोना आला आहे का ? एवढ्या सुदृढ नेत्याला कसा काय कोरोना होऊ शकतो असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना तिनवेळा झालेल्या करोनाचे संशोधन करण्याची गरज आहे अशी उपरोक्त टीका केली होती.

आता महाजन यांना कोरोची लागण झाल्यावर एकनाथ खडसे यांनी पलटवार केला आहे. तसेच महाजन यांना कोरोना झाला आहे की नाही असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे आता खासदार-महाजन यांच्या कोरोना मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटताना दिसून येणार आहे.

खडसे यांनी यावर बोलताना म्हंटले की, आपल्याला झालेला कोरोना खरा होता. मात्र, महाजन यांना झालेला कोरोना हा खरा आहे का ? की, जळगाव महानगर पालिकेत भाजपाची सत्ता गेल्याचा हा कोरोना आहे. कारण गिरीश महाजन हे नियमित व्यायाम करून फिट राहतात. यंग नेता म्हणून ते परिचित आहेत त्यामुळे त्यांचा कोरोना बाबत खरच आहे का असा तपास केला पाहीजे, या शब्दात खडसे यांनी महाजनांना टोला लगावला होता.

Team Global News Marathi: