भाजपा नेते घेणार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची करणार मागणी ?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. या आरोपानंतर विरोधकांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

तसेच राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडीवर एक नाही तर चार-चार पक्षांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपा नेते नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे बोलून दाखविले होते.

भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांच्या बोलण्याचा एकूण रोख पाहता भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी हालचाली सुरु केल्याचे संकेत मिळत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या घटनेनुसार राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत. राज्यपालांनी या घटनेची दखल घ्यावी. राज्य सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात किंवा कृती करण्यास असमर्थ असेल तर राज्यपालांनी राष्ट्रपतींसमोर सत्य मांडले पाहिजे. परमबीर सिंह यांनी लिहलेल्या पत्रासंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवला पाहिजे, अशी मागणीही सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

Team Global News Marathi: