‘मंगेशकर कुटुंबीयांची कृती १२ कोटी माणसांचा अपमान करणारी’

 

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. मात्र या पुरस्कार सोहळ्यावरून नाराजीनाट्य सुरूच आहे. ‘मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईतील ष्णमुखानंद हॉलमध्ये प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर होते. पण, या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर सुद्धा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख टाळण्यात आला होता. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त करत टीव्ट केले.

‘मंगेशकर कुटुंबीयांची कृती 12 कोटी माणसांचा अपमान करणारी’, जितेंद्र आव्हाडांची थेट टीका असं म्हणत आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच, ‘या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे’ अशी टीकाही आव्हाड यांनी केली.

Team Global News Marathi: