‘मंगळसूत्र, सिंदूर,अन्.’ कतरिनाचा पहिला करवाचौथ साजरा

 

चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्रींसाठी लग्नानंतर करवा चौथ हा पहिलाच दिवस होता. यात कतरिना कैफ आणि विकी कौशलही होते. विकी कौशलच्या दीर्घायुष्यासाठी कतरिनाने उपवास धरला होता.असे मानले जाते की विकीने देखील तिच्या साठी उपवास धरला होता. कतरिना कैफने हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. सासू-सासऱ्यांसोबत या दिवसाची विधी पूर्ण केली. कतरिना कैफने लग्नानंतरच्या पहिल्या करवा चौथचे काही फोटो शेअर केले आहेत.

कतरिनाने सिंदूर असलेली लाल साधी बिंदी, हातात विकीच्या नावाची लाल बांगडी आणि जरीसोबत गुलाबी रंगाची साडी घातली होती. यासोबत गळ्यातले मंगळसूत्र, कानातले आणि एंगेजमेंट रिंग कतरिनाचा लूक पूर्ण करत होते. कतरिना कैफने तिचा पहिला करवा चौथ तिच्या सासरच्या घरी साजरा केला. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनीही सासूसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

कतरिना कैफ आणि विकी कौशलने नवीन घराच्या बाल्कनीत फोटो क्लिक केले. कतरिनाचे हे फोटो हे सिद्ध करतात की एक अभिनेत्री असूनही तिने करवा चौथचा विधी पूर्ण विधीने केला आहे. दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. कतरिना कैफचे चाहते तिच्या कमेंट सेक्शनमध्ये कौतुक करत आहेत. रेड हार्ट आणि फायर इमोजी सेंड करत लाईक करत आहे. कतरिना कैफच्या या फोटोंवर प्रतिक्रिया देत अनेक सेलिब्रिटींनी लाईकचा वर्षाव केला आहे.

Team Global News Marathi: