माफी मांगो राज ठाकरे…भोजपुरी गाण्यानं घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

 

राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या सभेतून सुरु केलेल्या या इनिंगनंतर ठाणे, पुणे, औरंगाबादमध्ये झालेल्या सभा आणि कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. मराठी अस्मितेचा मुद्दा बाजुला सारत हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन नव्यानं मैदानात उतरलेल्या राज ठाकरेंना आता अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला बृज भुषण सिंह वारंवार आव्हान देत आहेत. यावरुनच आता एक भोजपुरी गाणं देखील तयार करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आता भोजपुरी गाण्यातून सुद्धा आव्हान देण्यात आलं आहे. भाजप खासदार बृज भुषण सिंहांनी दिलेल्या आव्हानंतर आता या गाण्यातून देखील त्यांना आव्हान देण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे बृज भुषण सिंह यांनी आता ‘राज ठाकरेंनी आता माफी मागितली तरी त्यांना 5 जूनला अयोध्येत प्रवेश नाही’ असं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता मनसे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र मनसेने अयोध्याला जन्स्याठी अतयारी सुरू केली असून अयोध्याला जाण्यासाठी ५ ट्रेन बुक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Team Global News Marathi: