Sunday, March 26, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

माफी मागा, नाहीतर स्वत:लाच जोडे मारा; शिवसेनेची राज्यपालांवर घणाघाती टीका

by Team Global News Marathi
November 21, 2022
in महाराष्ट्र
0
माफी मागा, नाहीतर स्वत:लाच जोडे मारा; शिवसेनेची राज्यपालांवर घणाघाती टीका

 

छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील नायक झाले असल्याचे सांगत नवा वाद राज्यपाल भगतसिंह कोश्यारीयांनी अंगावर ओढवून घेतला असून या विरोधात आता शिवसेनेने सडकून टीका केली आहे. शिवसेनेने राज्यपालांच्या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. शिवरायांचा अपमान करणार्‍यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात पोहोचलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतील एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या दया याचिकेची कागदपत्रे दाखवून वादळ ओढवून घेतले तेव्हा महाराष्ट्रातील भाजप व त्यांच्या सोबतचा मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला, त्यातले काही वळू रस्त्यावर उतरले. त्यांनी ”शिवसेना आता काय करणार?” असे विचारून राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला. आता हे सर्व जोडे स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माती खाल्ली व छत्रपती शिवरायांचा अपमान केला असल्याचे शिवसेनेने म्हटले. शिवाजी महाराज हे जुनेपुराणे, कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हीरो’ आहेत” असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर पाय ठेवला. हे भयंकरच आहे. महाराष्ट्रात वीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा गाजत असतानाच भाजप व मिंधे गटाचा पाय त्यांच्याच राज्यपालांच्या धोतरात अडकून कपाळमोक्ष झाला असल्याचे शिवसेनेने म्हटले.

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची ‘माफीवीर’ म्हणून टवाळी केली. शिवाजी महाराजांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठविल्याचा भलताच इतिहास उकरून काढला व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केला. वीर सावरकरांचा बचाव करताना त्यांनी शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणून देशातील समस्त शिवराय भक्तांच्या अस्मितेचा पाचोळा करून टाकला असल्याचे त्यांनी म्हटले. वीर सावरकरांच्या निमित्ताने हातात जोडे घेऊन रस्त्यावर उतरणारे भाजपचे शूरवीर व मिंधे गटाचे नरवीर आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत असा सवालही शिवसेनेने केला आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढार्‍यांनी शिवतीर्थावर येऊन महाराष्ट्राची माफी मागावी व अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावी, तरच त्यांचा स्वाभिमान की काय तो महाराष्ट्राला दिसेल असेही शिवसेना ठाकरे गटाने सुनावले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
व्यस्त असतानाही वेळातवेळ काढून राहुल गांधींकडून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस

व्यस्त असतानाही वेळातवेळ काढून राहुल गांधींकडून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस

Recent Posts

  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे
  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा बार्शीत गुन्हा दाखल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group