“मध्यावधी निवडणुका झाल्याच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील”

 

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनेही मध्यावती निवडणुका लागतील, असा दावा केला आहे. यानंतर आता मध्यावती निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुका लागू शकतील, असा दावा केला होता. त्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही पवारांचीच री ओढत हे सरकार तात्पुरते असल्याचे म्हटले होते. तसेच आता निवडणुका लागल्यास शिवसेनेचे १०० हून अधिक आमदार निवडून येतील, असा दावाही केला होता.

आता त्यापाठोपाठ आमदार रोहित पवार यांनी आता निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचेच सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या कर्जत दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते माध्यामांशी बोलत होते. निवडणुका लागल्या तर लढावे लागतीलच. मात्र, निवडणुका लागू नये, त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे.

तसेच एखाद्या विषय चिघळल्यानंतर तो कोर्टात गेला तर निवडणुका घ्याव्याच लागतील, त्यावेळी सर्वांत जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येतील. गेल्या निवडणुकात काही फरकाने पराभूत झालेले आमदार निवडून येतील, तसेच आमच्या आमदारांचे मताधिक्यही वाढलेले दिसेल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Team Global News Marathi: