उन्हाळा लक्षात घेऊन नागरिकांना लसीकरण केंद्रावर योग्य सुविधा द्याव्यात – मुख्यमंत्री

राज्यात दुसऱ्या टप्यातील कोरोना लसीकरणाला सुरवात झालेली आहे. या टप्यात वरिष्ठ नागरिक तसेच अति गंभीर आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाची लास टोचण्यात येत आहे. मात्र सध्या लसीकरणाला सुरवात झालेली असली तरी सुरु असलेल्या उन्हाळ्यामुळे नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना कोरोना लसीकरण केंद्रावर करावा लागू शकतो.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काही सूचना केल्या आहेत. उन्हाळा लक्षात घेऊन सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, व उन्हापासून संरक्षण होईल अशी व्यवस्था उभारावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ठाकरे विभागीय आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे लसीकरण संदर्भात बैठकीत बोलत होते.

राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिली असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दर दिवशी येणाऱ्या रुग्णांपेक्षा आज रोजीची संख्या उच्चांकी असून राज्यातील जिल्हा प्रशासनाने अतिशय वेगाने रुग्ण आणि त्यांचे संपर्क शोधणे, निर्बंधांचे आणि आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Team Global News Marathi: