जे नात्यात बांधूनही मुक्त असत ते प्रेम! प्रेम करा पण …कसे ! नक्की वाचा

खरं प्रेम मृत्यूचे कारण नाही तर जगण्याचं कारण असतं.

आंधळे प्रेम..

प्रेमाच्या दोन बाजू असतात ..त्याने किंवा तिने एकमेकांकडून कुठलीही अपेक्षा न करता निर्मळ भावनेने केलेले प्रेम आणि दुसरी आकर्षणाच्या हव्यासापोटी मनाच्या विकृतीतून निर्माण झालेले प्रेम!

एकीकडे तिच्या सुखात स्वतःच सुख मानणारे असतात तर दुसरीकडे तू माझी होऊ शकत नाही म्हणून तिची हत्त्या सुधा करणारे असतात.

संशयातून केलेली हत्त्या ,लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी केलेली विकृती, सुखी संसाराची स्वप्ने रगंवून पळून जाणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही.

या सर्वांमध्ये त्याच्या एकट्याचाच दोष नसतो..ह्याच नात्यात बरोबरीची भागीदारी ठेवणारी ” ती” देखील तितकीच जबाबदार असते, असं मला तरी वाटतं. .कारण ती म्हणजे कुकुल बाळ नव्हे.

घरच्यांनी लग्नाला “नाही” म्हटलं म्हणून पळून जाण्याचा निर्णय त्याच्या एकट्याचाच नसतो..ती सुद्धा त्यात सामील असतेच; म्हणूनच एवढी प्रकरणं समोर वाढतात.

अशा वेळी ती त्याला स्पष्ट नकार देऊ शकते.

विजय मनोहर पांढरीपांडे ह्यांनी लिहिलेल्या ‘ अंधारातल्या सावल्या ‘ ह्या कादंबरी मधल्या एका वाक्याने स्त्री – स्वभावाचा वेध घेतला.. ते म्हणतात ,”स्त्रीचं मन एकदा दुसऱ्याच झालं की तिला स्वतः च्या अशा भावना फारशा (उरतच नाही) नसतातच.

ज्या पुरुषांच्या ठाई मन गुंतून जात त्याच्याच अस्तित्वात ती जगते .लेखकाने स्त्रीच्या एका अत्यंत नाजूक पैलूला उजेडात आणण्याचा प्रयत्न केलाय.

पण स्वतः च बर वाईटही कळू नये? एवढी मूर्ख असते ती खरंच? माझ्या मते , स्वतः चा निर्णय घेण्याइतपत तरी ती सुज्ञ असावी. ‌

चार दिवसाचं आंधळं प्रेम हे पाचव्या दिवशी रस्त्यावर उघडं पडत.

लग्नाचं आमिष दाखवून मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या वर्तमानपत्रात नेहमीच वाचायला मिळतात .

तेव्हा मनापासून असं वाटतं , जशी प्रेमाची कबुली देतांना होकार देता येतो तसंच लग्ना आधी शारीरिक संबंधांसाठी ती नकार द्यायलादेखील समर्थ आहे आणि असायलाच हवं.

प्रेम आणि वासना ह्यातल अंतर तिला समजतं ..तशी तर्क शक्ती देवाने तिच्यात जन्मतः च दिलेली असते..कारण खरं प्रेम शारीरिक प्रेमाची मागणी करत नाही…आणि जिथे शारीरिक आकर्षण असतं तिथे प्रेम नसतं.

प्रेम काय ? कुठल्याच नात्यात इतकं समर्पित होऊ नये की आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचा विसर पडावा..प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते.ती पाळली की , नाती स्वच्छ आणि जन्मभरासाठी सोबत करतात.

खरं प्रेम मृत्यूचे कारण नाही तर जगण्याचं कारण असतं.

विश्वास, आपुलकी,आदर ,त्याग आणि जिव्हाळा ह्यापासून बनलेल एक वेगळं विश्व म्हणजे प्रेम! मनाच्या खेळात शरीराची बोली म्हणजे प्रेम नव्हे.जिथे विश्वास नाही तिथे संशय आपल बस्तान मांडत.

कुणातरीसाठी स्वतः ला इतकं वाहून नेऊ नये की स्वतः चा निर्णय घेता येऊ नये. प्रेमाच्या पिंजऱ्यात दोन व्यक्ती वास्तव्यास असतात..त्याला विश्वासाने गुंफलेले जाळीदार कुंपण असतं.

प्रेम म्हणाल तर जे नात्यात बांधूनही मुक्त असत ते प्रेम!

चूक फक्त एकाचीच नसते.चुकतात दोघेही .काही विकृत लोकांच्या कृत्यामुळे आजची पूर्ण पिढी बदनाम होते.खरं प्रेम जाती ,धर्माच्या नावाखाली गुदमरून जातं.तर कुठे घरच्यांच्या विरोधामुळे लोप पावत.

खूप वाईट वाटत तेव्हा ,जेव्हा प्रेमासाठी आत्महत्तेसारखे प्रकार घडतात.

पालक आपल्या मुलांचं चांगलं व्हावं म्हणून आयुष्यभर धडपडतात ..पण एका नकारामुळे आपलं मुल आत्महत्या करून कायमचा दुरावेल ह्याची त्यांना किंचितशी कल्पना सुद्धा नसते.

ह्यात चूक कुणाची ? मुला- मुलींची की आई – वडिलांची ? ह्यावर कुठलच ठरलेलं उत्तरं नाही..पण पालकांनी थोडा त्यांच्या बाजूने आणि मुला – मुलींनी आपल्या मोठ्यांच्या भावनेचा आदर राखला तर निम्म्या समस्या अशाच दूर होऊ शकतात .

उगाच कळत- नकळत कुणाच्या मृत्यूच कारण होण्यापेक्षा प्रेमाला नव्या दृष्टीने जीवनदान दिलेलं सोईस्कर नाही का ठरणार ??

हा लेख म्हणजे माझे वैयक्तिक मत , वाचक माझ्या मताशी सहमत असायलाच हवेत , ही माझी मुळीच अपेक्षा नाही…

चुकल्यास क्षमस्व !!

【लेखिका योगिता टवलारे】

ग्लोबल न्युज नेटवर्क: