लॉरेन्स बिश्नोई गँगने राखी सावंतला पाठवला धमकीचा, सलमान पासून दूर राहा नाहीतर……

 

अभिनेता सलमान खान याला अनेक दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हा धमकी देणारा सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आहे. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.आता एका ताज्या अहवालात असा दावा केला जात आहे की, राखी सावंतला ‘या प्रकरणापासून दूर राहा’ असा धमकीचा ईमेल आला आहे. ही टोळी सलमानला मुंबईत मारण्याचा कट रचत असल्याचे मेलमध्ये लिहिले आहे.

रिपोर्ट्सनुसार, ड्रामा क्वीनला मिळालेला धमकीचा मेल गुर्जर प्रिन्स नावाच्या व्यक्तीने पाठवला आहे, ज्याचा दावा आहे की तो लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. राखी सावंतला काल दोन वेळा धमकीचा ईमेल आला, एकदा सकाळी 7:22 वाजता आणि पुन्हा दुपारी 1:19 वाजता.एका महिन्यापूर्वी राखी सलमान खानच्या समर्थनात आली होती. राखीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने लॉरेन्स बिश्नोई गँगची माफी मागितली आहे. त्यात ती म्हणताना दिसली, ‘मी सलमान खान भावाच्या वतीने बिश्नोई समाजाची माफी मागते. माझा भाऊ सलमानवर वाईट नजर ठेवू नकोस.’

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसणार आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित अॅक्शन-कॉमेडी चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिल रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मल्टिस्टारर चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, भूमिका चावला, भाग्यश्री, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Team Global News Marathi: