CCTV दुरूस्त करणाऱ्याने आपल्या मोबाइलमध्ये घेतला कॅमेऱ्याचा अ‍ॅक्सेस, कपलचे खाजगी क्षण केले चित्रित

 

नवी दिल्ली | दिल्लीत घडलेल्या घटनेमुळे पोलीस सुद्धा चक्रावून गेले आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला आता सुद्धा केली आहे. सायबर सेलने बंगळुरूहून राशिद नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे.राशिदने दिल्लीमध्ये एका घरात सीसीटीव्ही ठीक करण्याच्या बहाण्याने त्याचा अ‍ॅक्सेस आपल्या मोबाइलमध्ये घेतला. त्यानंतर तो सीसीटीव्हीतून घरात असलेल्या पती-पत्नीचे प्रायव्हेट व्हिडीओ तो त्याच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत होता. इतकंच नाही तर नंतर तो कपलला ब्लॅकमेल करत लाखो रूपयांची मागणी करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साउथ दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने तक्रार केली होती की, काही महिन्यांआधी त्यांचा सीसीटीव्ही कॅमेरा खराब झाला होता. अशात सीसीटीव्ही कॅमेरा ज्या कंपनीने लावला होता त्यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तक्रार केल्यावर कंपनीने सीसीटीव्ही कॅमेरा ठीक करण्यासाठी एक टेक्नीशिअन पाठवला.

मात्र, या दरम्यान टेक्नीशिअनने कॅमेरा ठीक करत सीसीटीव्हीचा अ‍ॅक्सेस त्याच्या मोबाइलमध्ये घेतला आणि तेथून निघून गेला. काही महिन्यांनी दाम्पत्याच्या मोबाइलवर त्यांचेच प्रायव्हेट व्हिडीओ येऊ लागले आणि सोबतच धमकी देत म्हणाला की, ३ लाख रूपये द्या नाही तर व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणार अशी धमकी दिली होती. पोलिसांनी तपास करत राशिदला बंगळुरूहून अटक केली. राशिद मुळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. लॉकडाऊननंतर तो नोकरी सोडून बंगळुरूला नोकरी करण्यासाठी गेला होता.

Team Global News Marathi: